e-Hakka प्रणाली ही महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने सुरू केलेली एक ऑनलाईन सेवा आहे, जी जमिनीच्या हक्कफेर नोंदी (Mutation Entry) डिजिटल स्वरूपात प्रक्रिया करण्यासाठी वापरली जाते. या यंत्रणेच्या माध्यमातून नागरिक आपल्या जमिनीवरील मालकीहक्कात (Ownership) झालेल्या कोणत्याही बदलांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करू शकतात, जसे की खरेदी-विक्री, वारसा, वाटणी, गहाण, न्यायालयीन आदेश इ. यापूर्वी या प्रक्रियेसाठी तलाठी, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालय मध्ये जावेल लागत असे. आता मात्र नागरिक स्वतः घरबसल्या आपल्या संगणकावर किंवा मोबाइलवरून स्वतः हि कामे करू शकतात.

डिजिटल उपाय e-Hakka प्रणाली

  • जलद व सुलभ ऑनलाइन प्रक्रिया
  • पारदर्शकता आणि ट्रॅकिंगची सोय
  • प्रत्येक अर्जाला युनिक क्रमांक
  • संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वाक्षरीसह
प्रणालीचे नाव e-Hakka (ई-फेरफार)प्रणाली
उद्देश
७/१२ उताऱ्यातील हक्कफेर (mutation) प्रक्रिया ऑनलाईन करणे.
सुविधा
महाराष्ट्र शासन-महसूल विभाग
शासनाची अधिकृत वेबसाईट
फायदे
पारदर्शक, जलद प्रक्रिया, घरबसल्या सेवा

ई-हक्क प्रणालीचे मुख्य वैशिष्ट्ये

  • ऑनलाईन अर्ज
  • ट्रॅकिंग सिस्टम
  • दस्तऐवज अपलोड
  • डिजिटल मंजुरी
  • OTP आधारित प्रमाणीकरण

e-Hakka प्रणालीद्वारे नागरिक खालील कामे करू शकतात

  1. जमीन खरेदी-विक्री (Sale-Purchase Mutation)
  2. वारसाहक्क नोंदणी (Inheritance Mutation)
  3. कौटुंबिक वाटणी (Partition Mutation)
  4. न्यायालयीन आदेशावर आधारित नोंदी
  5. बोजा कमी करणे
  6. एकत्र कुटुंब नोंद कमी करणे
  7. अपाक शेरा कमी करणे
  8. इ.करार नोंद
  9. विश्वस्ताचे नाव कमी करणे
  10. बोजा चढविणे/गहाणखत
  11. संपत्तीचे हस्तांतरण (Transfer of Rights
  12. मृताचे नाव कमी करणे

इ. सुविधांसाठी नागरिक ऑनलाईन अर्ज करू शकतात.

ई-हक्क प्रणालीचे फायदे

  1. १००% पारदर्शक आणि सुरक्षित प्रक्रिया
  2. घरबसल्या जमिनीची नोंद अपडेट करण्याची सुविधा
  3. डिजिटल दस्तऐवज आणि ट्रॅकिंग यामुळे नागरिकांचे अधिकार सुरक्षित राहतात
  4. ७/१२ उतारा लवकर व अचूक अपडेट होतो
  5. ऑनलाईन सुविधा असल्यामुळे वेळेची बचत

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

  • सर्व दस्तऐवज स्कॅन करताना स्पष्ट असावेत.
  • सर्व अर्ज व्यवस्थित जतन करा – अर्ज क्रमांक अत्यंत महत्त्वाचा आहे.
  • OTP व पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका

FAQ

e-Hakka प्रणाली म्हणजे काय?

ई-हक्क ही एक ऑनलाईन सेवा आहे ज्याद्वारे महाराष्ट्रातील नागरिक जमीन खरेदी, वारसा, वाटणी यासारखे हक्कफेर अर्ज ऑनलाईन करू शकतात

e-Hakka अर्जाची स्थिती कशी तपासायची?

अर्ज सबमिट केल्यानंतर मिळालेल्या युनिक क्रमांकाद्वारे तुम्ही वेबसाईटवरून ट्रॅकिंग करू शकता

e-Hakka प्रणालीचे फायदे काय आहेत?

जलद व पारदर्शक प्रक्रिया, घरबसल्या अर्जाची सुविधा, डिजिटल ट्रॅकिंग, सुरक्षितता आणि अचूकता हे मुख्य फायदे आहेत